प्रतिनिधी । अमोल डोळस...!
शिंगवे नाईक येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक कामांना प्राधान्य देऊन २ कोटी ३७ लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यानिमित्त दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी ठिक पाच वाजता अ.नगर शिवसेना जिल्हाध्यक्ष शशीकांत गाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद अ.नगरचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या शुभहस्ते सदर विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले.
हा कार्यक्रम नगर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उद्धवराव दुसुंगे, जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले, शरदभाऊ झोडगे, गोविंदराव मोकाटे, बाळासाहेब हराळ, सभापती सुरेखाताई गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, रामदास भोर, उपसभापती रवींद्र भापकर, पंचायत समिती सदस्य व्हि.डी.काळे, गुलाब शिंदे, पोपट निमसे,अश्विनीताई जाधव, मंगलताई आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहिदास कर्डिले, देहरे गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी माजी सरपंच विश्वासराव जाधव,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते हरीश शेळके, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कोळकर, शिवसेना शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव,युवासेना शाखा अध्यक्ष किरण शेळके, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविराज जाधव, सनीभाऊ लांडगे, महेश काळे, ग्रामस्थ व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

