श्रीरामपूर । प्रतिनिधी :- धार्मिक जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये पिंपळे वस्तीवरील कुटुंबीयांना पंचवीस जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली.
जुन्या वादातून औरंगाबाद येथून आलेल्या 25 जणांनी जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक महिलांन सह लहान मुलांवर वर हल्ला केला हल्ल्यामध्ये तलवारी लोखंडी रॉड, कुराडी, लाट्या -काठ्यांचा वापर करण्यात आला असून हल्ल्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस दाखल होत नागरिकांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे..!
सविस्तर वृत्त असे की,अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे पिंपळे कुटुंबियाकडून धार्मिक जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त पूर्वीच्या वादातून दोन दिवसापूर्वी बबन पिंपळे यांना औरंगाबाद येथील नातेवाईकांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती यावरून वडाळा महादेव येथे पिंपळे कुटुंबीयांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित असलेल्या महिला पुरुष तसेच लहान मुले यांच्यावर औरंगाबाद येथून आलेल्या 25 जणांनी शसस्त्र हल्ला करण्यास सुरुवात केली या व्यक्तींनी तलवारी, कुराडी ,लोखंडी रॉड ,लाट्या काट्यांचा, हल्ल्यामध्ये वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या सशस्त्र हल्ल्यामध्ये अनिल पिंपळे राजू चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले असून श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना कळताच घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करत आहे....!

