शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
नांदगाव । प्रतिनिधी :-
दि.२१ रोजी रात्री 11:30 वा. अहमदनर जिल्ह्यातील नगर तालुक्यात नांदगाव येतील सजलपूर या आदिवासी वस्तीमध्ये छपराला अचानक आग लागून साहेबराव पोपट बर्डे व राजु पोपट बर्डे हे आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी धाव घेवून पाणी मारून आग आटोक्यात आणली असी माहिती सखाराम आण्णा सरक यांनी दिली.
आग लागली त्यावेळी घरामध्ये आई आपल्या एक महिन्याच्या छोट्या बाळासह आणखी तीन मुलींना घेऊन झोपली होती आग लागली हे लक्षात येताच आपल्या मुलींना घेऊन घराबाहेर पडत असताना जाळाचा लोळ अंथरुणावर पडला.
यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. परंतु संसार उपयोगी वस्तू सह घरातील सर्व कपडे किराणा धान्यं सर्व जळून खाक झाले. घटना स्थळी भेट देवून
सरपंच सौ सुनिता सखाराम सरक यांनी या कुटुंबियांना किराणा व भाजी पाला कपडे तातडीची मदत म्हणून दिले .
यावेळी सखाराम सरक यांनी शासनाच्या मदतीची वाट न बघता रोटरी क्लब अहमदनगर आॅफ मिड टाऊन चे किशोरजी डोंगरे अभियंता सा बा अहमदनगर यांना माहिती दिली असता सदर कुटुंबियांना तातडीने आवश्यक त्या संसार उपयोगी वस्तू सह मदत करू असे त्यांनी सांगितले तसेच आर्ट ऑफ लिव्हींग चे अहमदनगर चे जिल्हा समन्वयक मा श्री पद्माकर कुलकर्णी जी यांनी ही मदत करू असे सांगितले.
सदर जळीत घटनेची माहिती सरपंच यांनी गावचे का.तलाठी देशपांडे भाऊसाहेब यांना दिली असता तात्काळ घटनेची पाहणी करून गावातील उपस्थित पंचा समोर पंचनामा करून तहसीलदार नगर यांना कळविले.
सदरचं कुटुंब आता शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

