जालना । भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगांव ता.भोकरदन जि.जालना येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात व ग्रामपंचायत येथे आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सकाळी 7:30 वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,मानवहित लोकशाही पक्षाचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष, साप्ताहिक लहुजी शक्तीचे उपसंपादक,तथा रोखठोक न्युज चे जिल्हा प्रतिनिधी श्री.प्रभाकर गोफणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्यध्यापक महाजन सर, सर्व शिक्षक वर्ग गावातील प्रतिष्ठीत सरपंच कांताताई बम्हणावत यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करुन ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रागणात ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी मान्यवर उपसरपंच वसिमभाई शेख, ग्रामपंचायत सदस्य सुरेश लव्हटे,माजी सरपंच विलास साळवे,पत्रकार शरद साळवे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष असदभाई शेख,समद शेख, राजुसिंग बम्हणावत, ग्रामपंचायत सद्स्य मन्नु महाराज पांडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळवे, सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई शेख, रत्तन साळवे,आरेफभाई शेख टेलर,शिवाजी देशमुख, शंकर लव्हटे, व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

