shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेमळा ( गुंडेगाव) येथे २६ जानेवारीचे झेंडावंदन उत्साहात साजरा..!!

नगर प्रतिनिधी-(शिवा म्हस्के)
 (दि.२६) ७३ वा झेंडावंदन देशभरात उत्साह साजरा करण्यात आला तसेच नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे  प्रजासत्ताक दिनानिमत्ताने  कोरोना चे सर्व  नियम पाळून साध्या पध्दतीने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सोसायट्या, सामाजिक संस्था, यांच्या वतीने ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. 
      

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  मानेमळा ( गुंडेगाव) या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आसुन यावेळी माजी शिक्षक भानुदास माने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दिपक माने, उपाध्यक्ष रावसाहेब जाधव, मुख्याध्यापिका  क्षीरसागर  , खाकाळ सर,  शिंदे मॅडम सह अदि  पालक उपस्थितीत होते. 
        
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दिपक माने सांगितले की प्रशांत माने यांच्या सहकार्याने व विद्यार्थी पालक, ग्रामस्थांच्या लोकसभागातून ७० हजार रुपयांचे विविध विकास कामे पुर्ण  करण्यात आली आसून  यामध्ये तार कुपन, मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी, सुसज्ज प्रवेशद्वार, आकर्षक ध्वजारोहन  स्तंभ फेरा बांधण्यात आले आहे. 

अशी  माहिती दिपक माने यांनी यावेळी दिली आहे पुढील काळात सर्व पालक ग्रामस्थांच्या माध्यमातून  शाळेचा  विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यावेळी  उपस्थितीचे आभार श्रीमती क्षीरसागर ने मानले...
close