इंदापूर प्रतिनिधी:73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रम कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून संपन्न झाला.
सदर समारंभास कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, शांतीलाल शिंदे, रविंद्र सरडे, छगन भोंगळे, प्रविण देवकर, विश्वास देवकाते, निव्रूत्ती गायकवाड, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, सतिश व्यवहारे, कुबेर पवार, अशोक कदम, वसंत मोहोळकर, सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी मुकादम, ऊस वाहतुक कंञाटदार, कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, सर्व अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरक्षा विभागाची परेड होवून कार्यक्रम संपन्न झाला.

