shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*...

*भिमाई  आश्रमशाळेत  प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*...

*प्रजासत्ताक दिन हा संविधानाचे महत्व अधोरेखित करतो* :-  *संचालक राहुल सवणे* ( *ग्रामीण साहित्यिक*) 
*इंदापूर* (२६ जाने.२०२२) :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा देशाने स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती, तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या  कार्याला व आठवणींना राहूल सवणेंनी उजाळा दिला. भिमाई आश्रमशाळेत झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
  मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि मुलांचे , मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात (जिजाऊनगर ) भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन (दि.२६) सकाळी ठीक १०.१० वा.अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. तदनंतर भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे प्रकट वाचन हिरालाल चंदनशिवे यांनी केले. 
ध्वजारोहण मा.
श्यामराव पताळे पाटील (सहाय्यक, बांधकाम विभाग. महा.राज्य मुंबई) यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु.शकुंतला रत्नाकर मखरे (काकी),कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे,संचालक गोरख तिकोटे, ,संचालिका डॉ. आनार्या मखरे, अस्मिता मखरे तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते अश्वजित कांबळे, गोरख चौगुले व संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी. उपस्थित होते . कोविड- १९चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कार्यक्रमस्थळी खबरदारी घेण्यात आली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप सर यांनी केले.
close