shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!

होमगार्ड कार्यालयासाठी लवकरचं जागा उपलब्ध करून देऊ - पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार . 

शेवगाव(तालुका प्रतिनिधी) : प्रविण खोमणे...!

नेवासा येथे होमगार्ड कार्यालयात ७३व्वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी होमगार्ड कार्यालयाचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

 प्रमुख पाहुण्यांचे स्वागत होमगार्ड चे तालुका समादेशक बाळासाहेब देवखिळे यांनी केले तर होमगार्ड चे पलटनायक श्रीकांत  ससे यांनी परेडचे संचलन केले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक पोवार म्हणाले की म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या  मुख्य परिसरात लवकरच प्रशस्त अशी जागा होमगार्ड जवानांसाठी उपलब्ध करून देऊ तसेंच होमगार्ड जवानांचे कार्य कौतुकास्पद असून  पोलीस विभागाला नेहमीच होमगार्ड जवानांचे मोलाचे सहकार्य असते. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र होमगार्ड जवान "निष्काम सेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन सेवा करत असतात..!

यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक, जनसंपर्क  प्रमुख सुधीर चव्हाण, नगरसेवक राजेंद्र मापारी, बाळासाहेब केदारे, शरणपूर वृद्ध आश्रमाचे रावसाहेब मगर, काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमिटीचे चंद्रशेखर कडू, सर्कल ऑफिसर लवांडे,संगमनेर येथील निराधार समितीच्या मंगला देशमुख उद्योजक उदरें पाटील, साळवे भाऊसाहेब,  राजेंद्र कडू, पोलीस मित्र नळघे, पलटनायक दिलीप गायकवाड, अशोक टेमकर, अंश कालीन लिपिक अल्ताफ शेख,माजी होमगार्ड हमीद शेख , होमगार्ड संतोष गायकवाड, अमोल मोहिते, राजेंद्र बोरुडे, यांच्या सह महिला होमगार्ड उपस्थित होत्या. यावेळी सूत्रसंचालन होमगार्ड संपर्क प्रमुख सुधीर चव्हाण यांनी केले तर पत्रकार मोहन गायकवाड यांनी आभार मानले 

यावेळी समादेशक आधिकारी बाळासाहेब देवखिळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना होमगार्ड कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजा साठी सदरील जागा अपुरी पडत असल्याचे सांगितले असता पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ विलंब न करता भविष्यात पोलीस ठाण्याच्या आवारात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या वेळी सर्व होमगार्ड जवानांन कडून पोलीस निरीक्षक पोवार  यांचे आभार  मानण्यात आले 
---------------------------------------------------------------

नेवासा होमगार्ड विभागाचे माजी समादेशक पाठक यांचे निधन झाले असल्याने होमगार्ड जवानांकडून त्यांच्या उल्लेखनीय अश्या योगदानाबद्दल व विशेष कामासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
-------------------------------------------------------------------
close