नगर प्रतिनिधी -(शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील वाकोडी फाटा, वाळुंज ,दहिगाव, पारगाव ,वाटेफळ, अबिलंवाडी येथे अधिकाऱ्यांन सोबत घेऊन अडीअडचणी संदर्भात पंचक्रोशीतील नागरिक व शेतकऱ्यांन समवेत संवाद साधला.
पारगाव मौला येथे कोल्हापूर पध्दतीच्या ५९ लाख रुपये बंधाऱ्याचे भूमिपूजन खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार सुजय विखे यांनी नगर सोलापूर महामार्ग येत्या दोन वर्षांत संपूर्ण पुर्ण झालाच पाहिजे असे सक्त आदेश राष्ट्रीय महामार्ग अधिकार्याना दिले आहेत. तसेच नगर सोलापूर रस्त्यावरील भुसंपादन क्षेत्राचे आपसात समझोता करून आपली रक्कम काढून घ्यावी रस्ता भुसंपादन पैसे वितरणाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.त्यांनंतर आपले पैसे न्यायालय कडे वर्ग होतील. त्यानंतर न्यायालय पैसे वर्ग केले जाणार आहे. या भुसंपादन झालेल्या सातबारावर भारत सरकार नाव लागणार आहे.या गोष्टी शेतकरयांना लक्षात घेऊन योग्य ती कागदपत्रे सादर करुन आपले पैसे काढून घ्यावे असे आव्हान केले. नगर सोलापूर रस्त्यावरून वाळुंज बायपास ते चांदबीबी महाल येथे सुरत हैदराबाद नॅशल हायवे, येत आहे,.रिंगरोड मुळे नगर शहरातील ट्राफीक प्रश्न मार्गी लागणार आहे. नगर शहरातील उड्डाण पूल हि लवकरच जनतेच्या सेवेत येणार आहे.
नगर सोलापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 'अ"५१६ साठी भुसंपादन झालेली जमीन संदर्भात शेतकऱ्यांना अनेक कैफियत मांडल्या काही आपल्या शेतातील झाडांची नोंद नाही, घराची नोंद नाही, रस्ता खोदकामात पाइपलाइन तुटल्याची भरपाई नाही, ऐने जमिन मोबदला मिळत नाही.बाधीत इमारती मोबदला मिळावा, महसुली अधिकारी शेतजमीन भुसंपादन क्षेत्राचे पैसे काढण्यासाठी अधिकारी टक्केवारी मागणी करत असल्याची तक्रार खासदार विखे व अधिकारी यांच्या समोर मांडल्या.अनेक विभागाचे समस्या असल्याने त्या सोडविण्यासाठी स़ंबधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मौजे वाटेफळ गावातील ३१ घरामालकांन यात घर जमीनदोस्त होणार आहे.
पण सरकारी जमीन असल्याने भरपाई देण्यास अडचणी येत आहे. दहिगाव येथील श्री राम मंदिर देवस्थान तिर्थ क्षेत्र 'क" वर्ग मधुन वर्ग' ब" मध्ये समावेश करण्याची मागणी दहिगाव ग्रामस्थांनी केली.
या वेळी दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ सुजय विखे,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी बी.पी दिवाण तसेच कृषी विभागाचे तालुका अधिकारी पोपटराव नवले, कृषी पर्यवेक्षक जिलिंदर गांगडेॅ कृषी साह्यक वसंत भोईटे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी, प्रांत कार्यालयचे अधिकारी नंदकुमार साठे, नायब तहसीलदार शिल्पा पाटिल,सिमा जाधव,मंडळ अधिकारी वैशाली साळवे, तलाठी महादेव शेलार, तलाठी श्रीनिवास गोवडा, महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कन्हैयालाल ठाकुर, उपकार्यकारी अभियंता निलेश रोहनकर, वाटेफळ ग्रामविकास सरीता पवार, ग्रामविकास स्वाती घोडके,वाटेफळ सरपंच बाळासाहेब अमृते, चेअरमन उध्दव अमृते, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भापकर,गुणंवडी माजी सरपंच वाल्मिकी नागवडे,रुईछत्तीसीचे माजी सरपंच श्रीकांत जगदाळे, माजी सभापती हरीभाऊ कर्डिले, उपसरपंच अनिल करांडे, दहिगाव उपसरपंच महेश म्हस्के, सुनिल म्हस्के, श्री राम ट्रस्ट अध्यक्ष अन्शाबापु म्हस्के,सचिन साबळे, माजी सरपंच रविंद्र अमृते दत्ता नाराळे, माजी सभापती राम साबळे, वाळकी चे सरपंच शरद बोठे, किशोर पवार, संपतं वाघमोडे, अधिकारी कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

