shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर्मलनगर येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : २६ /   नगर येथील  सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ निर्मलनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरसेवक श्री. निखिल वारे यांच्या हस्ते झेंडावंदन करून ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला .

नगरसेवक श्री .निखिल वारे यांच्या हस्ते सर्वप्रथम झेंडावंदन करण्यात आले. नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले .भारतीय तिरंग्यास उपस्थितां कडून मानवंदना देण्यात आली .उपस्थित मान्यवरांनी देशभक्तीपर भाषण करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला .  सामाजिक कार्यकर्ते बंटी हिवाळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अजुनही काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले . तसेच डॉ .ताजवे यांनी शुभेच्छा देऊन देशभक्तीपर भाषण केले .

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले .

प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, राहुल सांगळे ,संतोष काळे, सुशांत भिंगारदिवे, प्रथमेश कोल्हे ,जावेद इनामदार,साजिद इनामदार , प्रथमेश गटणे, सचिन अकोलकर,दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे , उषाताई भगत ,रंजना काळे , पुष्पा वायकर , भराट मावशी ,वर्षा गवळी , ज्योती पुरी , सोनाली निमसे, शरयु काळे, सेजल काळे,आहिरे मॅडम, गहिले मॅडम आदी महिला व नागरिक उपस्थित होते .
close