शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
..अखेर तिसर्या दिवशी 91 वर्षांच्या आजींनी उपोषण सोडल..!!
अकोले : कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच तेथे येणार्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या 91 वर्षाच्या वृद्ध महिलेचे तहसील कार्यालयासमोर तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण वनखात्याच्या लेखी व आ. डॉ. किरण लहामटे यांनी निधी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर अखेर आज सायंकाळी मागे घेण्यात आले.
अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवार पासून 91 वर्षांच्या हौसाबाई नाईकवाडी यांनी कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार व अन्य प्रश्नी बेमुदत उपोषण सुरू केले होते.पहिले दोन दिवस वनविभागाच्या अधिकार्यांचे उपोषण सोडविण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले. काल रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषणास बसलेल्या वयोवृद्ध हौसाबाई नाईकवाडी यांची आ.किरण लहामटे,अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम, तहसीलदार सतीश थेटे, राजूर वन परिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली.
आ.डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले, कळसूबाई शिखरावरील मंदिर परिसर जिर्णोध्दार करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असून भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.आ. डॉ. लहामटे यांनी त्यांना नारळ पाणी दिल्याने अखेर काल तिसर्या दिवशी त्यांनी आपले उपोषण सोडले.तर तहसीलदार थेटे यांनीही श्रीमती नाईकवाडी यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले आहे.त्यात म्हटले आहे की, आपले वय लक्षात घेता आपल्या उपोषणातील मागणी वरिष्ठ कार्यालयाच्या अधिनस्त असल्याने आम्ही संबंधित कार्यालयाशी संर्पकात राहून नियमानुसार योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करण्याची दक्षता घेत आहोत. यावेळी तुकाराम महाराज जाधव, राम तळेकर, शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी काकड, प्रा. बादशहा ताजणे, शांताराम महाराज पापळ, बाळासाहेब भांगरे आदी उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

