shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांची पिडीसी बॅंकेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी घेतली भेट.

राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांची पिडीसी बॅंकेचे नवनिर्वाचित चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी घेतली भेट.
इंदापूर प्रतिनिधी:पिडीसी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस प्रणित सहकार पॅनलची पुन्हा एकदा एकहाती सत्ता आली आहे.तसेच बँकेच्या चेअरमन पदी यंदा "ड वर्गातून" विक्रमी मताधिक्‍याने निवडून आलेले प्रा.दिगंबर दुर्गाडे सरांची एकमताने निवड करण्यात आली आहे.या निमित्ताने आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावरती सखोल चर्चा केली तत्पूर्वी ना.दत्तात्रय भरणे यांनी बॅंकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल प्रा.दुर्गाडे यांचा सत्कार केला.
या भेटीनंतर दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले की,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारातील योगदान खूप मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिडीसी बँकेचा कारभार अतिशय उत्तम पद्धतीने चालला असून भविष्यात देखील सर्व संचालकांच्या सहकार्याने हि बॅंक देशात निश्चितपणे नावलौकिक वाढवेल,त्याच बरोबर शेतकरी व सभासद बांधवांना अधिक उत्तम पद्धतीने सेवा देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
close