shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जीवन आधार फौंडेशनच्या औरंगाबाद विभाग मिडीया प्रमुख पदी सतिश लोखंडे यांची नियुक्ती...!


औरंगाबाद । प्रतिनिधी :-
औरंगाबाद कन्नड तालुका वाकी (देवाची) येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश लोखंडे यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पाहुन जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू  फोर्स महाराष्ट्र राज्य (रजि.) संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.शंकर पोवार साहेब यांनी एका पत्राद्वारे सतिश लोखंडे यांची नियुक्ती केली. 

सतिश लोखंडे हे सातबारा न्यूज, शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह,सत्य पोलिस टाईम्स, दैनिक शिल्पकार, जिल्हा प्रतिनिधी अशा प्रिंट मिडिया, पोर्टल, युट्यूब चॅनल,अशा मिडीयाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करून सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संघटनेकडून २०२०-२१ चा आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित. अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.तसेच आपल्या लेखनाच्या माध्यमातून निराधार, विधवा महिला व अपंगांना शासकीय अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न व मदत मिळवून दिलेली आहे.

घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे गरीब रुग्णांना मदत,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य.औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष ग्रामीण , मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा उपाध्यक्ष, औरंगाबाद, दिशा निसर्ग पर्यावरण व प्राणी संवर्धन अभियान महाराष्ट्र राज्य,अशा राज्य स्तरीय संघटनेमध्ये कार्यरत याची दखल या संघटनेत निवड झाल्याबद्दल फौंडेशनच्या खालील मान्यवरांनी अभिनंदन केले.यामध्ये मा..संजय कदम.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सौ.प्रतिभाताई पोवार.महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्ष, युवराज पोवार. युवक राज्य अध्यक्ष, डॉ.शोभा महाजन.महीला राज्य उपाध्यक्षा, मा.तुषार पाटील.राज्य सचिव, अरविंद कांबळे युवक राज्य अध्यक्ष-सौ. निरजा ताई आंबेरकर;कोकण विभाग अध्यक्षा या मान्यवरांनी केले आहे.
close