shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन


 योग्य निर्णय घेण्याची क्षमता बुद्धिबळ खेळामुळे मिळते - महापौर रोहिणीताई शेंडगे

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप                 
                                                              अहमदनगर: दि ९  / अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे खुल्या बुद्धिबळ  स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे नगर महापालिकेच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी बुद्धिबळ पटावर चाल चालून केले . अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले.

   आपल्या उदघाटन पर भाषणात महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाले की  अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंसाठी घेत असलेल्या या विविध स्पर्धेबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून खेळाडूंनी मैदानी खेळाबरोबरच बुद्धिबळ खेळ सारखे बौद्धिक खेळ खेळून आपल्या बुद्धीला चालना द्यावी व भविष्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता बुद्धिबळ खेळामुळे मिळते .पालकांनी आपल्या पाल्याला या खेळात प्रोत्साहन देऊन त्यांचा खेळ उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे ही सांगितले. खेळाडूंनी बुद्धिबळ खेळात आपला अधिकाधिक सराव वाढवून आपले कौशल्य पणाला लावून आपल्या शहराचे नाव उंच करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व अहमदनगर महानगरपालिके चे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेला नेहमीच सहकार्य राहील व लवकरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर *महापौर चषक बुद्धीबळ स्पर्धेचे  आयोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.

 अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष श्री नरेंद्र कुलकर्णी यांनी बुद्धिबळ खेळासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित कराव्यात असे सांगितले व शहरात अश्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर अनेक खेळाडूंचा सराव होईल व खेळाडूंचा खेळ अधिक चांगला होईल. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना नेहमी खेळाडूंसाठी विविध स्पर्धा व प्रशिक्षण आयोजित करत असते तसेच जिल्हाभर बुद्धिबळ खेळाचे प्रसार व प्रचार यांचे कार्य अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून चालू असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या माध्यमातून अनेक खेळाडू अहमदनगर जिल्ह्यात घडविलेले आहेत.
     
यावेळी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारूनाथ ढोकळे, पंच मनीष जसवाणी, देवेंद्र ढोकळे, अविनाश कांबळे आदीसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.                  
                                                             प्रास्ताविकात बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले की  अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खिस्त गल्ली येथील सप्तक सदन मंगल कार्यालय येथे प्रत्यक्षात बोर्डवर ही स्पर्धा घेण्यात आली अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकाराने विविध स्पर्धा, खेळाडूंसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात हे आयोजन करण्यासाठी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचे नेहमीच सहकार्य असते. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन विश्वस्त पारूनाथ ढोकळे यांनी केले तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.
close