shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बीडमध्ये शहरातील मटका अड्ड्यावर धाड..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 

बीड शहरातील कबाड गल्ली भागात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि शिवाजीनगर ठाण्याच्या पथकाने छापा टाकून मटक्याचा अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी मोबाईल, प्रिंटर आणि मटक्याच्या चिठ्ठ्या असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे आढळलेल्या हिशोब वही मध्ये तब्बल 81जणांची नावे आहेत. त्या अनुषंगाने आता पोलीस संबंधित सर्व लोकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले. दरम्यान सदरील मटका अड्डा हा एका राजकीय नेत्याचा असल्याची   माहिती समोर आली आहे.







बीड शहरातील कबाड गल्ली भागात सुरू असलेल्या एका मटक्याच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळराजे दराडे पोलीस कर्मचारी रवींद्र आघाव,  सचिन आघव यांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी भोसले नामक व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य सात ते आठ जण फरार झाले आहेत. या कारवाईत मोबाईल , प्रिंटर , मटक्याच्या चिठ्ठ्या , हिशोब वही असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी यापूर्वीही बीड शहर आणि परिसरात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे जुगार अड्डे उध्वस्त केले आहेत. सोमवारी रात्री केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहेत.

close