shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब सायकर..!

पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बाळासाहेब लक्ष्मण सायकर यांची महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मनाली रिसॉर्ट येथे केन्द्रीय पदाधिकारी व राज्य कार्यकारीणी पदाधिकारी यांची रविवारी (ता. २) बैठक पार पडली. या बैठकीत बाळासाहेब सायकर यांना महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष नागोराव मगर आणि सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांच्या यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पुणे झोनचे अध्यक्ष मंगेश पारखी, सचिव- अमोल शेलार, कार्याध्यक्ष- अक्षय पाटील, विवेक पाटील, विकास जाधव, शुकलाल जाधव, पांडुरंग खरात, संदीप बनकर, योगेश बांदल, अप्सर पाशा सय्यद, मुस्तफा शेख , रोहीत काळभोर व संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पदाच्या माध्यमातून राज्यातील विज कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणार आहे. असे निवडीनंतर बोलताना संघटनेचे नवनियुक्त उपाध्यक्ष बाळासाहेब सायकर यांनी सांगितले आहे.
close