shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून उर्मी मिळते- प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे


शिरसगाव (बाबासाहेब चेडे):-महात्मा फुले यांच्या समाजसेवेत स्वतःला झोकून देणाऱ्या सावित्रीबाई फुले 19व्या शतकातील निर्भय मनाच्या सहचारिणी होत्या,त्यांच्या समर्पित कार्यातून महिलासबलीकरण यासाठी उर्मी आणि दिशा मिळते, असे मत माजी प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे यांनी व्यक्त केले.

       वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती प्राचार्य शेळके हॉलमध्ये साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.गागरे बोलत होते.अध्यक्षस्थानी रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी टी.ई.शेळके होते.वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून  'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 'ही सादर केले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे ह्या विषयांचे 'चिंतन'सर्वांनी ऐकले, मनोगत व्यक्त केले.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिलेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगितली व पुढे म्हणाले, आज स्त्री सुरक्षित आणि जागृत झाली आहे का?सावित्रीबाई फुले यांचे महत्व आणि समर्पण आजच्या मुली मनापासून जाणतात का? हे प्रश्न लक्षात घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

       प्राचार्य अनारसे यांनी फुले दापंत्याचे योगदान सांगून उपक्रमाचे कौतुक केले.प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य शेळके यांनी अध्यक्ष भाषणात सांगितले की, आजच्या कोरोना स्थितीत असे कार्यक्रम हे विचारांची संस्कृती टिकवून ठेवतात, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि भूमी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे वेगळेपण सांगितले.भीमराज बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.
close