shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फिल्मस्टाईल बाईकवरचा स्टंट करण्याचे चॅलेंज पडलं महागात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२

फिल्मस्टाईल बाईकवरचा स्टंट करण्याचे चॅलेंज पडलं महागात..!!


औरंगाबाद : नुकतेच दोन दिवसापूर्वी औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक ते सेव्हन हिल व सेव्हन हिल ते क्रांतीचोक यादरम्यान जालना रोडवर थर्टी फस्टच्या रात्री एका तरुण व तरूणीने चालत्या दुचाकीवर किस करत असतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हाइरल होताना दिसला होता. त्या तरुणाला हा बाईक स्टंट महागात पडले आहे. त्याला नुकतेच पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

   या व्हिडीओ बाबत पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्या तरुणांचा शोध घेत असताना त्यांना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सध्या समाज माध्यमावर (सोशल मीडिया) एका दुचाकीवर एक तरूण व त्याच्या सोबत एक तरूणी हे जिवघेणी व धोकादायक अश्लील स्टंडबाजी करुन दुचाकी चालवत आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमधील तरूण हा अपेक्स हॉस्पिटल येथे असल्याची बातमी पोलिसांना मिळाली असता पोलिस उपनिरिक्षक ए .पी.तांगडे ,पोलिस कर्मचारी संतोष बमनत हे तात्काळ अपेक्स हॉस्पिटल येथे पोहचून त्या तरुणाला ताब्यात घेतले असून या तरूणाचे नाव सुरज गौतम कांबळे (24, व्यवसाय शिक्षण रा. अलोकनगर, प्रशांत हॉटेलच्या पाठीमागे, बीडबायपास औरंगाबाद) असे सांगितले. याविषयी पोलिसांनी त्यास विचारपूस केल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, दि. 31. रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास त्याने तडप फिल्ममधील बाईकवरचा स्टंट करून दाखवण्याचे चॅलेंज स्वीकारले होते. त्याच्या मैत्रीणीला एच.एफ डिलक्स गाडीवर पेट्रोलच्या टाकीवर पाठीमागे तोंडकरून बसवुून क्रांतीचौक ते सेव्हन हिल व परत सेव्हन हिल ते क्रांतीचौक पर्यंत गाडी वेगाने चालवून चुंबन घेण्याचा स्टंट त्याने केला होता. या सर्व प्रकराचा अनोळखी व्यक्तीने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हिडिओ मधील तरूण हा मिच असल्याचे व तरूणी ही माझी मैत्रीण असल्याचे सुरज कांबळे यांने पोलिसांनी सांगितले.

 
    सुरज गौतम कांबळे याने दि. 31 रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास क्रांतीचौक ते सेव्हन हिल परत सेव्हन हिल ते क्रांतीचोक यादरम्यान जालना रोडवर त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव तसेच हयगईने व निष्काळीपणाने चुंबन घेत गाडी चालवली. स्वतः च्या व इतराच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करताना तसेच सार्वजनिक रोडवर इतरांना त्रास होईल अशा प्रकारे मैत्रीनीचे चुंबन घेऊन अश्लील वर्तन केल्याने त्यांचे विरुध्द जिन्सी पोलिस ठाण्यात कलम 279, 294, 336 भा.द.वि. सहकलम 184 मो.वा.का. कलम 110/117 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 

close