शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२
एसटीचा संपाबाबत महत्वाची बातमी: गुणरत्न सदावर्ते आऊट; ‘ह्या’ नव्या वकिलांची नियुक्ती..!!
प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून चांगलेच वातावरण पेटलेले आहे. आता हा अगदी मोठा विषय झाला आहे.
या संपामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंकडून आता हा खटला काढून घेण्यात आला आहे. आता ऍड सतिश पेंडसे हा खटला पाहणार आहेत.
त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत सरकारवर टीका करणाऱ्या सदावर्तेंना कर्मचाऱ्यांनी नाकारल्याचं दिसून येत आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या या संपानंतर काही कर्मचारी हजर झाले.
तर अनेकांनी हजर होण्याचे टाळले. परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
तसेच परिवहनमंत्री अनिल परब आणि कृती समिती यांची देखील एक बैठक झाली. दरम्यान सुनील निरभवणे यांनी विधिज्ञ गुणरत्न सदावर्तें यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंनी विलनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला आहे.
कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकील म्हणत आहेत. पण गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांना भडकवण्याचे काम ते करत असल्याचे निरभवणे यांनी म्हटले आहे.
तर, सदावर्ते यांना पत्र दिलंय.. आता आम्ही नवीन वकिल सतिश पेंडसे यांना वकील म्हणून नेमलं आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य असेल.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

