shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या तालुका अध्यक्ष पदी ढुस तर सचिव पदी कराळे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या तालुका अध्यक्ष पदी ढुस तर सचिव पदी कराळे..!!

देवळाली प्रवरा : महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी आज राहुरी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली असून समितीच्या तालुका अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांची तर सचिव म्हणून प्रशांत सुधाकर कराळे यांची निवड करणेत आली आहे. 
        महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या राहुरी तालुका समन्वयक म्हणून काम करताना आप्पासाहेब ढुस यांनी ९ महिन्याचे बाळ असलेल्या कोरोना विधवेचे स्वतःच्या पुतण्या सोबत लग्न लावून राज्याला आदर्श घालून दिला. तसेच दिवाळी भाऊबीजेला ३० कोरोना विधवा महिलांना साडी व फराळ वाटप करून दिवाळी सणाला त्यांना मानसिक आधार दिला. तसेच स्वतःचा जन्मदिन साध्या पद्धतीने साजरा करून त्यामध्ये बचत झालेले ९० हजार रुपये कोरोनाणे छत्र हरपलेल्या ९ मुलींच्या नावे प्रत्येकी १० हजार रुपयेचे राष्ट्रीय बचतपत्र तयार करून गरीब कुटुंबाला आधार दिला. तसेच कोरोनामुळे छत्र हरपलेल्या तालुक्यातील जास्तीत जास्त मुलांना बालसंगोपन योजना लागू करून देणेत त्यांचा मोठा सहभाग असल्याने तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी ढुस यांना दिल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी तालुका समिती निवडीच्या दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. 

     आप्पासाहेब ढुस यांचे अध्यक्षतेखाली हेरंब कुलकर्णी यांनी निवडलेल्या राहुरी तालुका समितीच्या सचिव पदी देवळाली प्रवरा येथील प्रशांत कराळे, सदस्य पदी त्रिंबकपूर येथील डॉ. संदीप कोळसे, वांबोरी येथील प्रवीण ससाणे, कोपरे येथील आदिनाथ पवार, टाकळीमिया येथील सुनीता निमसे, बोधेगाव येथील प्रगती पगारे, देवळाली प्रवरा येथील भाग्यश्री कदम, डॉ. वर्षा संसारे यांची तर तज्ञ सदस्य म्हणून माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदींची समितीवर निवड करण्यात आली असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी आप्पासाहेब ढुस यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close