---------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेस केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज, धारूर आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपच्या गुन्ह्यात केज पोलिसांच्या अटकेत असलेल्या महिलेस तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्या नंतर केज पोलिसांनी केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार आहे.
दरम्यान धारूर आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हे दाखल असल्याने चौकशीसाठी तिला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते. तर आता पर्यंत 'ती' महिला वगळता अद्याप इतर गुन्हेगार ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नसून लवकरच इतर आरोपी ताब्यात घेतले जातील.
------------------------------------------------------

