shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कु.काशिश शेख हिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल,मुस्लिम ओबीसी आणि उर्दू शिक्षक संघटनेतर्फे सत्कार..!

श्रीरामपूर (प्रतिनिधी): - येथील असलमभाई शेख (सर) यांची कन्या आणि बालिका विद्यालयाची विद्यार्थिनी कु. कशिश असलम शेख (इय्यत्ता ८ वी) हिने शिष्यवृत्ती परीक्षेत १२ वा क्रमांक मिळवत उत्कृष्ट गुण संपादन केल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हा आणि अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा सरचिटणीस इब्राहिम बागवान (सर) यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इकबाल काकर (सर), उपाध्यक्ष इब्राहिम बागवान (सर),सचिव आरिफ शेख (सर),तसेच राहाता डी.सी.पी.एस. तालुकाध्यक्ष किशोर जगताप (सर), माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष असलम शेख (सर), आणि शेख मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

कु.कशिश हीने संपादन केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल स्वाभिमानी संपादक सेवा संघ तथा समता फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,अॅड.मोहसिन शेख,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष हाजी फयाजभाई बागवान, जिल्हा संघटक जाकीरभाई शहा,राजु कुरेशी,अजिज आत्तार आदींनी अभिनंदन केले आहे.
close