shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सहकारी संस्थेचा कायदा ..!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

 ग्राहक साक्षरता अभियान

विषय: आम्ही काही प्लॉटधारक पुण्यातील एका भागात स्वतःचे बंगले बांधून राहतो. आमची सोसायटी स्थापन झालेली नाही, सर्व प्रकारची कामे सोसायटीसारखीच सुरू आहेत. आता सोसायटीमध्ये सर्व प्लॉटअंतर्गत १५ फूट मोकळा रस्ता सोडलेला आहे; परंतु वाहने वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, काय करता येईल?

उत्तर: प्लॉटधारकांमध्ये जर कोणत्याही प्रकारची सोसायटी अथवा असोसिएशयनची स्थापना झाली नसेल, तर सर्वप्रथम सोसायटी स्थापन करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर एकदा सोसायटीचे नियम व कायदे सहकारी कायद्याच्या चौकटीत बसवून सोसायटीमध्ये पोटनियमांप्रमाणे पार्किंगचे धोरण आखता येईल व त्याची अंमलबजावणीसुद्धा करता येऊ शकते.

लेखकः-ॲडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे 

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218 

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.

श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत. कारण गेल्या दाेन महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (ॲडवाेकेट श्री सुनिल काेहारे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणार्या काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्ष, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
close