shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"श्री शाहू विद्या मंदीर खडांबे" शाळेत १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०४ डिसेंबर २०२२


"श्री शाहू विद्या मंदीर खडांबे" शाळेत १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न..!!


 राहुरी : राहुरी तालुक्यातील खंडाबे येथील शाहू विद्या मंदीर मध्ये माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी त्या वेळचे बहुतेक शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकोलकर सर होते. या कार्यक्रमासाठी वाघुंबरे सर, शिंदेसर, काळे सर, जवरे सर, टेकाडे सर, खळेकर सर, पटारे सर, कोरडे सर, कु-हे सर, कुसमुडे सर उपस्थित होते.



 

प्रास्ताविक अशोक उंडे यांनी केले. सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संदीप भोकरे, गोरख जाधव, सखाराम सरक, भाऊसाहेब कल्हापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रकाश कल्हापुरे यांनी मानले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close