shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरातील 'तो' सावकार पत्नी आणि मुलासह पसार,पोलिसांचेही दुर्लक्ष..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२

देवळाली प्रवरातील 'तो' सावकार पत्नी आणि मुलासह पसार,पोलिसांचेही दुर्लक्ष..!!

राहुरी : आडते व्यापारी असलेल्या खासगी सावकाराच्या आर्थिक जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणारा संदीप कदम हा तरुण अद्यापही राहुरी फॅक्टरी येथे उपचार घेत आहे. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही राहुरीचे पोलीस त्याच्याकडे फिरकले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर त्या सावकाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राहुरी पोलीस ठाण्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणार्थींकडेही राहुरी पोलिसांनी कानाडोळा केला आहे.
दरम्यान, कदम याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कुणकूण लागताना पोलिसांचा ससेमिरा सुरू होईल, या धास्तीने देवळाली प्रवरा येथील तो सावकार आपल्या पत्नी आणि मुलासह पसार झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. संदीप कदम याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठीही त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. त्यात त्या सावकारासह मुलाचे व पत्नीचे नाव असूनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. कदम हा गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असून राहुरी पोलिसांनी त्याची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त होत आहे. आता कदम याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

या घटनेत त्या सावकाराला पाठीशी घालण्यासाठी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला आहे. त्यामुळे आता पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. राहुरी पोलीस ठाण्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून त्यांच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close