shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर : शेतातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२

अहमदनगर : शेतातील विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह..!!
 
अहमदनगर ( पिंपळगाव माळवी) : येथील तरूणाचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला. त्या तरूणाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रसाद रघुनाथ साबळे (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

गेल्या तीन दिवसांपासून प्रसाद साबळे हा तरूण घरातून निघून गेला होता. त्याच्या घरच्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान रविवारी त्याचा मृतदेह अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close