शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
शेतकर्यांनी पिकांचे उत्पादन तंत्र समजून घ्यावे
शैलेश देशमुख : कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने केलवडला हरभरा कृषि दिन..!!
राहाता : कोरडवाहू शेतीसाठी हरभरा हे शाश्वत पीक असले तरी शेतकर्यांनी पिकांचे उत्पादन तंत्र समजून घेत लागवड करावी. हिच माहिती शेतकर्यांना व्हावी हा समूह प्रथमदर्शक कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्राचे कृषि विद्या विभागाचे शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि भारतीय कृषि अनुसंधान केंद्र नवी दिल्ली यांच्यावतीने कडधान्य उत्पादन वाढ अंतर्गत हरभरा समुह प्रथमदर्शक कार्यक्रमाच्या निमित्ताने केलवड येथे आयोजित कृषि दिन कार्यक्रमात शैलेश देशमुख बोलत होते. केलवडचे ज्येेष्ठ मार्गदर्शक सुभाष गमे यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास पिक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दंवगे, प्रात्यक्षिकातील सहभागी शेतकरी बाळासाहेब गमे, वाल्मीक गमे, विजय गोर्डे, भाऊसाहेब गमे, भागवत गमे, काकासाहेब गमे, अमोल कहांडळ आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्यावतीने कडधान्यांची उत्पादकता वाढवी, नवे वाण, नवीन तंत्रज्ञान यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा या कार्यक्रमचा उद्देश असतो, असे देशमुख यांनी सांगून यावर्षी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संशोधित फुले विक्रम हा वाण शेतकर्यांना देण्यात आला आहे. इतर वाणांच्या तुलनेत रोग प्रतिकार क्षमता जास्त उभट वाण आणि उत्पादन देखिल जास्त आहे. यांच्या शेतकर्यांना मोठा लाभ होणार आहे.
यावेळी सहभागी शेतकरी अमोल कहांडळ यांनी उत्पादनात वाढ होणार आहे. इतर वाणांपेक्षा वाढ, रोग किडीचे प्रमाण कमी आणि घाट्यांचे प्रमाण जास्त आहे यामुळे उत्पादन चांगले मिळणार आहे शिवाय कृषि विज्ञान केंद्रातील तंञाज्ञानामुळे खर्चात बचत झाली असे सांगितले.
बदलत्या हवामानाचा विचार करतांना शेतकर्यांनी पिकसंरक्षण समजून घ्यावे. एकात्मिक किड नियंत्रण बिज आणि रोप प्रक्रिया करावी, असे पिकसंरक्षण विभागाचे प्रमुख भरत दंवगे यांनी सांगुन कांदा, हरभरा, गहू आदी पिकावरील रोग-किडी नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी सुभाष गमे यांनी आभार मानले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

