शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
एलसीबीची कामगिरी || भिंगार ठाण्यातील गुन्हा
खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून पसार असलेल्या महिलेला अटक..!!
अहमदनगर : खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिंगार बाजारातून अटक केली. सकीना उर्फ शोभा योगेश भोसले (रा. गंगापूर जि. औरंगाबाद, हल्ली रा. वाळुंज ता. नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती गेल्या वर्षभरापासून पसार होती.
15 जानेवारी 2021 रोजी रात्री नऊ वाजता शितल अशोक भोसले यांना विरोधात तक्रार दिल्याच्या कारणातून दत्त्या धुर काळे, नाड्या धुर काळे लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. तसेच याच कारणातून योगेश धुर काळे, योगेश सुसा भोसले, नागेश रेयेजा काळे, सकीना भोसले, बजाज बाबा काळे (सर्व रा. वाळुंज) यांनी सिध्दु हरिदास चव्हाण, राहुल हरिदास चव्हाण, प्रिया हरिदास चव्हाण, सुचिता हरिदास चव्हाण, आशंका काळे यांना गंभीर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी शितल भोसले यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान मारहाणीत जखमी झालेला सिध्दु हरिदास चव्हाण याचा मृत्यू झाल्याने दाखल गुन्ह्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले होते. या गुन्ह्यातील आरोपी दत्त्या काळे, नाड्या काळे, योगेश काळे, योगेश भोसले, नागेश काळे यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील पसार असलेली आरोपी सकीना भोसले शनिवारी भिंगार उपनगरात बाजार करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक नियुक्त करून भोसले हिला अटक करण्याच्या सूचना केल्या पथकाने तिला भिंगारमधून अटक केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

