इंदापूर येथे पत्रकार दिनानिमित्त सफाई कामगार महिलांचा होणार सन्मान
** तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान
इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, इंदापूर येथील डॉक्टर नीतू मांडके हाऊस सभागृह येथे आयोजन केले असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महिला सफाई कामगारांचा पैठणी देऊन सन्मान व तालुक्यातील विकासाचे भागीदार म्हणून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची,माहिती पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व सचिव सागर शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील आदर्श व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत यामध्ये.आदर्श शैक्षणिक संस्था चालक वीरसिंह रणसिंग,आदर्श सामाजिक कार्य अंकिता मुकुंद शहा,आदर्श शैक्षणिक संस्था श्रीमंत ढोले,सहकार रत्न किशोर पवार, कर्तव्यदक्ष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयुब मुजावर,उत्कृष्ट वैद्यकीय सेवा डॉक्टर विनोद राजपुरे, युवा उद्योजक श्री मुक्ताई ग्रुप बापू गायकवाड,आदर्श शिक्षक वसंतराव फलफले,आदर्श राज्य गायिका राधा खुडे, शेतीनिष्ठ शेतकरी साहेबराव मोहिते, व कलागौरव शिवकुमार गुणवरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.तसेच इंदापूर तालुक्यातील आदर्श पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमलताई साळुंखे ढोबळे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत,भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शरद जामदार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे,मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष भिसे,यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
** फोटो.
पुरस्कार प्राप्त मान्यवर.

