सर्वांना पोरक करून का गेलास माई -अनिता खरात
इंदापूर प्रतिनिधी: सिंधुताई सपकाळ माईंच्या आठवणी सांगताना अनिता ताई खरात म्हणाल्या की माझ्यासारख्या अनेक महिलांना आज समाजात मानाचे स्थान आहे किंवा आम्ही समाजात ताठ मानेने फिरतो व समाज कार्य करतो ही शिकवण आम्हाला माईंनी (सिंधुताई सपकाळ) दिली आहे , माईंच्या संकल्पनेतूनच तेजपृथ्वी ग्रुप उदयास आला माईच्यां सागंण्यावरुनच मि समाज कार्यत सक्रिय झाले , माईंनी अनेकांचे संसार फुलवले अनेकांना आधार दिला सर्वांच्या आयुष्यात सुख निर्माण करून माई तुम्ही आम्हाला सोडून गेला ही बातमी मनाला न पटणारी आहे आम्ही तुमच्या शिकवणीवर पुढे चाललो आहे आणि माई इथून पुढेही कायम तुमच्या शिकवणी वरच आम्ही पुढे जाऊतुमच्या आधोर्या ईच्छा पुर्ण करण्याचा मि नक्की प्रयत्न करेन माई हीच तुम्हाला श्रद्धांजली .तुम्ही आमच्या क्षणाक्षणाला मनात कायम घर करून राहणार मी माईंच्या आशीर्वादाने प्रेरणेने व मार्गदर्शनाने घडले आहे व इथून पुढे ही माईच्यां धोरणाने व त्यानीं घालून दीलेल्या शिकवणीने प्रवास करेन, पद्मभूषण, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार असे जवळपास 750 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी आहेत माझ्या माई अशा माझ्या मायला मनापासून तेजपृथ्वी ग्रुप कडून भावपूर्ण श्रद्धांजली

