पुण्यातील गॅलक्झी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..!
शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क :-
पुणे : देशाची माय माता, अनाथांची माय, या माईने एक वैशिष्ट्यपूर्ण आगळेवेगळे सामाजिक कार्य करून देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राची मदर तेरेसा सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यामाईंचा जन्म भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.त्या ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्रातील हजारो अनाथ महिला,मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच (जानेवारी २०२१) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या अन्याय अत्याचाराला मोठ्या प्रमाणात वाचा फोडण्याचे काम त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुरूवातीला केले.
अनेकांची अनाथांची माय बनलेल्या माईंचे निधन झाल्यामुळे राज्य भर शोककळा पसरली आहे.
अशा या थोर माईस शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..! 🙏

