दापोडी:- जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती. सी .के. गोयल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या(N.S.S) वतीने मंगळवार दिनांक २५/१/२०२२ रोजी सकाळी १०:३० ते ११:३० यावेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने" राष्ट्रीय मतदारजागृती दिन"संपन्न झाला.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मतदारजागृती पर सामूहिक शपथ! एन.एस.एस. स्वयंसेवकांना देण्यात आली.राष्ट्रीय मतदारजागृती कार्यक्रमासाठी मार्गदर्शक: म्हणून दीपकजी म्हस्के-(सामाजिक कार्यकर्ते दापोडी,) यांचे मार्गदर्शन महाविद्यालय विद्यार्थ्यांना झाले.
दीपक मस्के: मार्गदर्शन करताना म्हणाले"देशातील सुज्ञ नागरिकांमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवकांनी(स्वयंसेवकांनी) समाजामध्ये जागृती करून मतदानाचा अधिकार योग्य पद्धतीने बजावला पाहिजे. त्यामुळे लोकशाहीचा विकास खऱ्या अर्थाने होण्यास हातभार लागेल!"
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मतदार जागृती बाबत शपथ दिली.कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. विनोदकुमार डिके, श्री हनुमंतराव गायकवाड, श्री. लक्ष्मण कोहिनकर कु. चंचल मुगुटमल, श्री कपिल कांबळे, श्री यश मुरकुटे, आणि महाविद्यालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता.
या कार्यक्रमासाठी ५७ स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार: प्रा.सिद्धार्थ कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे- मातरम गीताने झाली.

