shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपुरात उपनगरांना "नगर "असे नाव देण्याची परंपरा असताना सईदाबाद हा "बाद" काय प्रकार आहे ?कुठे चालवलं श्रीरामपूर आमचं ...!!


श्रीरामपूर- खबडीबाबा मंदीराच्या नावावरून या परिसराला  "खबडी  "असे नाव पडले .त्या परिसराला श्रीरामपूरच्या इतिहासात सईदाबाद हे नाव अस्तित्वातच नसताना बेकायदेशीरपणे सईदाबाद नावाची कमान उभारुन या कमानीचे बेकायदेशीरपणे उद्घाटन केले याच्या विरोधात नगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी हिंदू रक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेत जाऊन केली .

या शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते , मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे , संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण फरगडे  , नगरसेवक किरण लूनिया  , माजी शहराध्यक्ष संजय पांडे , देवीदास चव्हाण ,मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे  ,  ओबीसी मोर्चाच्या महीला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई हरदास  ,उपाध्यक्षा  किरण सोनवणे   ,ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ साळवे  ,ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब धनवटे ,राजेंद्र पाटणी   ,सोमनाथ कदम गणेश भिसे   ,संजय यादव सोमनाथ पतंगे   ,संदीप वाघमारे  ,बिट्टूशेठ क्ककड अर्जुन करपे  ,विष्णू मोढे बबन जाधव  ,महेश विश्वकर्मा  ,सुनील इंगळे आदींनी केले

* यावेळी बोलताना श्री प्रकाश चित्ते म्हणाले की खबडीबाबा मंदिराच्या ओळखी वरून या परिसराला  "खबडी " असे नाव पडलेले आहे . श्रीरामपूरच्या साठ-सत्तर वर्षांच्या इतिहासात सईदाबाद यानावाचा कुठेही संदर्भ नाही हे नाव अस्तीत्वात नाही असे असताना .या परिसराला सईदाबाद म्हणून गृहीत धरून सईदाबाद नावाची कमान बेकायदेशीरपणे या श्रीरामपुरात लावली जाते माजी नगराध्यक्ष या कमानीच बेकायदेशीरपणे उद्घाटन करतात .काय चाललंय श्रीरामपुरात ? श्रीरामपूर शहरात उपनगरांना  "नगर  "असे नाव देण्याची परंपरा असताना उपनगराला         " बाद " हे नाव देण्याचे कारण काय ?सईदाबाद हे दिलेले नाव बेकायदेशीर असून नगरपालिकेने  कायदेशीर कारवाई  अशी मागणी श्री चित्ते यांनी यावेळी केली


*यावेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले त्या परिसरात खबडीबाबा चे मंदिर आहे .या मंदिरात रोज खबडी बाबाची पूजा होते वर्षातून एकदा खबडीबाबाची जत्रा भरते या जत्रेच्या निमित्ताने येथे महाप्रसादाचा भंडारा घातला जातो या भंडाऱ्याचा या परिसरातील बहुसंख्य नागरिक लाभ घेतात असे असताना या परिसराला खबडीबाबा नगर असे नाव देणे गरजेचे आहे असे न करता साध्या फ्लेक्स वरून गुन्हा दाखल करणारी नगरपालिका बेकायदेशीरपणे सईदाबाद नाव देऊन त्या नावाची बेकायदेशीर कमान उभारली या कमानीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला . त्याबेकायदेशीर कार्यक्रमावर नगरपालिकेने गुन्हा दाखल का केला नाही ?असा सवाल श्री बाबा शिंदे यांनी यावेळी विचारला .

*या वेळी विश्व हिंदू परिषदेचे बाळासाहेब हरदास यांचेही भाषण झाले त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला .

*यावेळी नगरपालिकेच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या .  या प्रसंगी मनसे विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे, मनसे तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, मनसे शहराध्यक्ष निलेश लांबोळे, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, मनसे शहर सचिव दीपक सोनवणे, मनसे शहर संघटक निलेश सोनवणे, मनसे तालुका सरचिटणीस दीपक लांडे, मनसे शहर उपाध्यक्ष ईश्वर जगताप,सुरेश सोनवणे  ,बाळासाहेब हिवराळे  ,उमेश धनवटे बाळासाहेब आहिरे , संजय रूपटक्के  ,गणेश जायगुडे दर्शन चव्हाण  ,सागर मलिक  ,देवा गंगावणे प्रतिक देशमुख , रितेश काटे , प्रसाद सातोरे  ,अजित गायकवाड , बाळासाहेब गाडेकर , ढाकणे मामा  ,दीपक सोनवणे  ,आकाश वाघ गणेश जाधव  ,अशोक लोखंडे , संतोष डहाळे निलेश लांबोळे  ,दीपक सोनवणे  ,ईश्वर जगताप , सिद्धार्थ पटाईत आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
close