shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोरदरा साठवण तलावाचे श्रेय लाटण्याचा आमदार किरण लहामटे यांचा केविलवाणा प्रयत्न..!


अकोले । प्रतिनिधी :-
मोरदरा साठवण तलावाचे श्रेय लाटण्याचा आमदार किरण लहामटे हे भूमिपूजन करून केविलवाणा प्रयत्न करीत आहे. स्थानिक नागरिक यांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता होणाऱ्या या उद्घाटन चा निषेध करण्यात आला आहे.


समशेरपूर येथील मोरदरी प्रकल्पाचे २०१५ साली प्रशासकीय मान्यता देऊन कार्यरंभ आदेश देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे काम सुरु होते. 
         परंतु कामामध्ये मोठे तास डाईक लागल्यामुळे अभियंताच्या सांगण्यावरून त्याचे सर्व डिझाईन करण्यासाठी वेळ लागला.
 त्यानंतर साधारण मोठ्या प्रमाणावर काळी माती, मुरूम उपलब्ध नाही ही सर्व गौणखनिज नदीपात्र, शेतकरी यांच्या शेतातून उपलब्ध करणेसाठी गेली दोन वर्षे शेतकरी वर्गाबरोबर चर्चा होऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी फार मोठी अडचण मोहदरी जाण्यासाठी रस्त्याचं नव्हता एवढी मोठी माती वाहतूक करण्यासाठी समशेरपूर ते मोरदरी रस्ता बनविणे कुठल्याही योजनेत नव्हते. त्यानंतर प्रत्यक्षात आज तेथे रस्ता होतो आहे. मोरदरी येथील शेतकऱ्यांना जमिनीचा प्रश्न होता. अशी अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सर्व स्थानिक मोहदरी शेतकरी एकत्र येऊन प्रश्न सोडवत आहे. त्याचबरोबर प्रशासनास सहकार्य करत आहे व येथून पुढे प्रशासनाला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी करणार आहे. 

खऱ्या अर्थाने सदरचा प्रकल्प मंजुरीचे सर्व श्रेय तत्कालीन मंत्री मधुकररावजी पिचड यांनाच आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाचे सर्व पाठपुरावा माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, सोमनाथ मेंगाळ व मीनानाथ पांडे साहेब व मोरदरी मधील शेतकरी पुनाजी मेंगाळ, गंगाराम मेंगाळ ,विजय मेंगाळ, शांताराम मेंगाळ, सिताराम मेंगाळ, मंगा मेंगाळ, किसन मेंगाळ, भरत मेंगाळ, बस्तिराम मेंगाळ, वाळिबा मेंगाळ, रामनाथ मेंगाळ, मारुती मेंगाळ आणि इतर सर्व वारंवार गेली सात वर्षे प्रशासनामध्ये नाशिक, नगर व मुंबई येथे जाऊन प्रकल्पाला चालना देण्याचे काम करत आहे. 

कुठलेही श्रेय न घेता प्रामाणिकपणे सातत्याने प्रकल्पासाठी ज्याच्या अडचणी येतात ते सोडविण्यासाठी धडपडताना दिसतात परंतु आज उद्घाटन कार्यक्रम पत्रिका बघितली या आमदाराने येथील शेतकरी वर्गाला विश्वासात न घेता व मोरदरी प्रकल्पाचे काहीच माहिती नसताना अशाप्रकारे उद्घाटन करणे हे अशोभनीय काम किरण लहामटे करत आहे. कृपया हे अशाप्रकारचे चुकीचे काम लोकप्रतिनिधीला शोभत नाही. आम्ही मोहदरी ग्रामस्थ आमदार किरण लहामटे यांचा जाहीर निषेध करतो. कृपया अशा प्रकारचे उद्घाटने आपण करून आमची दिशाभूल करू नये ही
अशी विनंती देखील केली आहे.
close