पूर्णा । कलीम सय्यद :-
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने काही आरक्षित गाड्यांमधून काही डब्बे अनारक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या प्रमाणे तिरुपती ते आदिलाबाद (१७४०५) या रेल्वे गाडीस २० जानेवारीपासून ५ डब्बे, आदिलाबाद ते तिरुपती (१७४०६) या रेल्वेस २० जानेवारीपासून ५ डब्बे, बेंगलोर ते नांदेड (१६५९३) या रेल्वेस २७ जानेवारीपासून ३ डब्बे, नांदेड ते बेंगलोर (१६५९४) या रेल्वेस २७ जानेवारीपासून ३ डब्बे, तिरुपती ते श्री साईनगर शिर्डी (१७४१७) या रेल्वेस २५ जानेवारीपासून ६ डब्बे, आदिलाबाद ते मुंबई (११४०२) या रेल्वेस २० जानेवारीपासून २ डब्बे, नांदेड ते मुंबई (१७६११) या रेल्वेस १ फेबु्रवारी ४ डब्बे, सिंकंदराबाद ते मनमाड (१७०६४) या रेल्वेस २० जानेवारीपासून २ डब्बे, काचिगुडा ते नारखेर (१७६४१) या रेल्वेस २० जानेवारीपासून ८ डब्बे, तिरुपती ते अमरावती (१२७६५) या रेल्वेस २२ जानेवारीपासून ४ डब्बे, धर्माबाद ते मनमाड (१७६८८) या रेल्वेस २० जानेवारीपासून ८ डब्बे तर नांदेड ते मुंबई (१७६१८) या रेल्वेस २० जानेवारीपासून ४ डब्बे अनारक्षित असणार आहेत.

