shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा: येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२
 

 
 देवळाली प्रवरा : येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ..!!

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरात येथिल श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेस प्रांताधिकारी डॉ. अनिल पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
देशात आजपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात असताना राहुरी तालुक्यातील सर्वच प्राथमिक केंद्रात या लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून सोमवार दिनांक ३ जानेवारी रोजी देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात प्रांताधिकारी डॉ.अनिल पवार, तहसीलदार एफ.आर.शेख, मुख्याधिकारी अजित निकत यांच्या उपस्थित १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात जवळपास ४०० मुलांना लस देण्यात आली.

 

यावेळी वैद्यकीय अधिकारी जाकीर शेख, अनिल मुळे, मुख्याध्यापक विनोद अकोलकर, मुख्याध्यापक अकोलकर विनोद भगवान, उपमुख्याध्यापक सुधाकर आल्हाट, पर्यवेक्षक नानासाहेब काळे, वर्गशिक्षक मकरंद रायते, जी.के. रामफळे, एफ.एम.शेख , पी.डी.कडूस आदि उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close