shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घाटात कठड्याला गाडी आदळल्यामुळे ‘ते’ कुटुंब थोडक्यात वाचलं..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२


घाटात कठड्याला गाडी आदळल्यामुळे ‘ते’ कुटुंब थोडक्यात वाचलं..!!

शेवगाव : अहमदनगर कडून शेवगावकडे जात असताना मध्येचं लागत असलेल्या करंजी घाटात नुकताच एक स्वीप्ट गाडीचा अपघात झाला असुन, अपघातात गाडीतील चौघे एकाच कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहेत. ती स्विफ्ट गाडी अहमदनगर कडून निघाली असताना ती शेवगावकडे जात होती त्या घाटामध्ये उताराला स्विफ्ट गाडी चालकाला भरधाव वेगात असल्यामुळे नियंत्रित करता आली नाही.त्या घाटात रस्त्याच्या कडेला एक सुरक्षितता म्हणून मजबूत अशा कठड्याची निर्मिती केली आहे, त्या कठड्यांना ही गाडी जोरात जाऊन आदळली या अपघातामध्ये स्विफ्ट गाडी चा समोरील भाग पूर्ण फुटला असून या अवघड आशा वळणाच्या घाटात कमी वेगाने प्रवास करणं योग्य असताना वाहन चालक वाहनाच्या वेगावर मर्यादा ठेवताना दिसतं नाहीत.
त्या कठड्याला गाडी धडकल्यामुळे गाडीचा ब्रेक लागला आणि वेग नियंत्रित झाला. समोर जर तो कठडा नसता तर साधारण 70 फूट पेक्षा खोल दरीमध्ये गाडी कोसळली असती समजायची..?, परंतु दैव बलवत्तर म्हणून या कोहळ कुटुंबावरचा मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामध्ये मच्छिद्र कोहळ व सविता कोहोळ हे दोघे पती पत्नी तसेच एक मुलगा आणि मुलगी त्यांची नावे रुपाली आणि श्रीकांत हे चौघेही जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 
close