shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रेकिंग : विवाहितेचा छळ; पतीसह सासूवर गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२


ब्रेकिंग : विवाहितेचा छळ; पतीसह सासूवर गुन्हा दाखल..!!

राहुरी : न्यायालयीन कामकाजासाठी व दवाखाना उपचारासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सौ. आरती भवार या विवाहित तरुणीला तिच्या सासरच्या लोकांनी वेळोवेळी मारहाण केली.

 
वेळप्रसंगी उपाशीपोटी ठेवून तिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती दिगंबर संभाजी भवार व सासू अरुणा संभाजी भवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. आरती भवार (रा. मानोरी ता. राहुरी) या तरूणीचा विवाह काही वर्षापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील दिगंबर भवार याच्याबरोबर झाला. लग्नानंतर तीन वर्षांनी सौ. आरती हिने न्यायालयाच्या कामकाजासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत म्हणून तिचा छळ केला.


 
सौ. आरती हिच्या भावाने पैसे दिल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा दवाखाना उपचारासाठी 50 हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी सौ. आरती हिला वेळोवेळी शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. वेळ प्रसंगी तिला उपाशीपोटी ठेवून तिचा शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला घराबाहेर काढून दिले.

या सर्व त्रासाला कंटाळून सौ. आरती भवार हिने राहुरी पोलिसांत धाव घेऊन तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक हनुमंत आव्हाड करीत आहेत.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close