शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०४ डिसेंबर २०२२
महिला ग्रामसेवकास ऑफिसमध्ये घुसून मारहाण, गुन्हा दाखल..!!
अहमदनगर : बऱ्याचदा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडत असतात. आता महिला ग्रामसेवकास कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
अहमदनगरमधील कापरेवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोघा जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेचा कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेने निषेध केला आहे. अधिक माहिती अशी : अरुणा भगवान गलांडे या कापरेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेविका म्हणून काम पाहत आहेत.
31 डिसेंबरला गलांडे या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचे कामकाज करत होत्या. त्यावेळी गावामधील संतोष संभाजी गायकवाड व राणी संतोष गायकवाड हे दोघे जण आले
आणि तुम्ही आम्हाला नेहमी त्रास का देता असे म्हणत अरुणा गलांडे यांना त्यांनी मारहाण केली. तसेच कार्यालयातील कागदपत्रे फाडली. त्यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सोडवले.
सदर घटना घडल्यानंतर ग्रामसेविका अरुणा गलांडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून एक जानेवारीला संतोष संभाजी गायकवाड व राणी संतोष गायकवाड
यांच्याविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याचा तसेच मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

