कोरोनावरील उपचार घेत राजवर्धन पाटील जनतेच्या सेवेसाठी ऑनलाइन माध्यमातून व्यस्त.
इंदापूर प्रतिनिधी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्यानुसार ते घरीच उपचार घेत असून अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी फोन,व्हाट्सअपच्या माध्यमातून ते जनतेच्या सेवेत कार्यतत्पर असून आपल्या कार्यात आणि कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. अनेकांशी त्यांनी संवाद साधला आहे.
राजवर्धन पाटील यांचा जनसंपर्क मोठा असून अनेक ठिकाणी ते भेटी देऊन जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत असतात. जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना घरीच उपचार घ्यावे लागत आहे. अशावेळी देखील त्यांनी आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. संपर्क माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत.

