चांडगाव, दि. २६: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त चांडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदानावर
सरपंच देविदास उर्फ मुन्ना आरडे यांनी राष्ट्रध्वज फडकावून ध्वजारोहण करून मानवंदना दिली.
तत्पूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इंदापूर जिल्हा पुणे स्वच्छ सुंदर अंगणवाडी सर्वेक्षण स्पर्धा २०२२ मध्ये चांडगाव अंगणवाडीस बिजवडी गटात प्रथम क्रमांक आल्याने अभिनंदनाचा ठराव मांडुन सत्कार करण्यात आला. यावेळी भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 नुसार तंबाखू नियंत्रण शपथ घेण्यात आली सदरचा कार्यक्रम कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर काही मोजक्या मान्यवरांच्या व पालक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हे निर्बंध पालन करून साजरा करण्यात आला
यावेळी माझी सरपंच व विद्यामान सदस्य रमेश काका मदने,उपसरपंच स्वप्निल पवार, माजी सरपंच सुस्मिता भोसले, विद्यामान सदस्य मनिषा भोसले, अविदा व्हलगडे, संजवीनी साळवे, विजया पिसाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका पवार, रणसिंग गुरुजी, अंगणवाडी सेविका संगिता देवकर, मदतनीस सुनिता नगरे, पोलिस पाटिल गणेश गोळे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश कृष्णानाथ भोसले, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मदने, माजी सैनिक अशोक साळवे, माझी शिक्षक आबासाहेब गुरुजी भोसले, संजय देवकर इ. मान्यवर व नागरीक उपस्थित होते.
यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

