इंदापूर येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त सर्वं रोग आरोग्य शिबीर संपन्न.
अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधी: दि.२३ जानेवारी २०२२ रोजी भारतीय अमृतमहोत्सवानिमित्त व महामानवाच्या जयंती उत्सवानिमित्त साधून सावित्रीबाई फुले यांच्या १९१ या जयंतीनिमित्त इंदापूर येथे सावता माळीनगर मंगल कार्यालयांमध्ये मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर पांडुरंग (तात्या )शिंदे इंदापूर तालुका अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा यांच्या वतीने प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबीर संपन्न झाले.
यावेळी डॉक्टर एम. के. इनामदार म्हणाले की, पांडुरंग तात्या शिंदे हे नेहमी समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे काम तात्यांच्या माध्यमातून आम्हास लाभतात त्यांचा आम्हाला आनंद वाटतो आपल्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा घडत राहो ही सदिच्छा. तात्या गोरगरीब पेशंटसाठी बिल कमी करा लक्ष द्या असे नेहमी फोन करत असतात.
यावेळी पांडुरंग तात्या शिंदे म्हणाले की, जानेवारी महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले जयंती, फातिमा शेख जयंती, जिजाऊ जयंती चे अवचित साधून हा उपक्रम राबविला आहे. प्रथम मूर्ती महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त फातिमा नावाच्या पाच महिलांचा सन्मान आम्ही करीत आहोत या सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आजच्या महिलांनी वाटचाल करावी हीच अपेक्षा. तसेच शिंदे म्हणाले की सर्व रोग आरोग्य शिबिरामध्ये १६१ जणांनी तपासणीसाठी सहभाग नोंदवला असून
गोरगरीब गरजूंनी दवाखान्या संदर्भात काय अडचण असेल तर ९८८१४३४३३४ या नंबर वरती संपर्क साधावा त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार असल्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
दरम्यानच्या काळात या शिबिरास भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिबिरास भेट दिली.
यामध्ये माजी नगराध्यक्षा मायाताई विंचू, माजी नगराध्यक्षा नलिनी शिंदे, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला राऊत, दक्षता कमिटीच्या सदस्य सौ.सायरा आतार, सौ.जयश्रीताई खबाले, सौ.अनिताताई खरात, इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, माधुरी लडकत, तसेच जय इन्स्टिट्यूटचे जयंत नायकुडे सर, महिला पत्रकार धनश्री गवळी, डॉ. एम. के. इनामदार, डॉ. महावीर गांधी, डॉ. वैभव गांधी, डॉ. एस. एम. कुलकर्णी, डॉ. नितीन एकतपुरे, डॉ. सुरेश सूर्यवंशी, डॉ. दत्ता गार्डे ,डॉक्टर अमोल उन्हाळे
व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मोनाली जाधव, फतीमा दिलावर बागवान, फतीमा रमजान बागवान, फातिमा खय्युम कुरेशी, फातिमा नूर महम्मद मोमिन, सायरा हमीद आत्तार, अनिताताई खरात, जयश्री खबाले, लता जयवंतराव नायकुडे, धनश्री दत्तात्रय गवळी, सरस्वती भुवन, छाया नारायण भोंग, मनिषा संजय भोंग, फातिमा करीम शेख, फातिमा सिकंदर बागवान, प्रल्हाद राऊत गुरुजी, माधुरी शिवराम लडकत महिला पोलीस, अपर्णा सुखदेव जाधव पोलीस उपनिरीक्षक, इंदापूर सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जय इन्स्टिट्यूटचे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. पांडुरंग तात्या शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार, भाजप शहर अध्यक्ष शकील भाई सय्यद,इंदापूर नगरपरिषद गटनेता कैलास कदम,भाजप किसान मोर्चा चे माऊली चौरे,सागर भुमकर अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा, ,आबा थोरात,शिवशाही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन आरडे, जयंत नायकुडे, प्रल्हाद राऊत गुरुजी, , भानुदास व्यवहारे, शबीर कुरेशी,राजू राऊत, अशोक व्यवहारे, दत्तात्रय गवळी इत्यादी उपस्थित होते.
सूत्रसंचालन पत्रकार सुधाकर बोराडे यांनी केले.
हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका, क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य, महात्मा ज्योतिराव फुले बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने संपन्न झाला.

