shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकज कुमावत यांची गेवराई तालुक्यात धाडसी कार्यवाही : आठ लाख रु. किंमतीचे चंदन जप्त..!!

२१ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल: १७  ताब्यात ३ फरार..!!
   

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गेवराई तालुक्यात चंदन तस्करा विरुद्ध धाडसी कार्यवाही केली असून सुमारे आठ लाख रुपयाचे चंदन आणि मोटार सायकली, मोबाईल व इतर साहित्यसह ९ लाख ३८ हजार रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २१ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १७ जणांना ताब्यात घेतले आहे आणि ३ जण फरार झाले आहेत.


या बाबतची माहिती अशी की, दि. २० जानेवारी गुरुवार रोजी रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की, गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील विष्णू साहेबराव बांगर हा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी काही लोकांना एकत्र जमवुन परिसरातील चंदनाची झाडे चोरून तोडून त्याच्या स्वतःच्या शेतात मोरवड नावाने ओळखल्या जात असलेल्या भागातील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये चोरून आणलेले चंदनाची लाकडे तासून त्यातील गाभा काढून तो पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून पत्र्याच्या शेडमध्ये  ठेवला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात साहेब यांना कळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पंकज कुमावत साहेब आणि केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मुसळे यांच्यासह उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी यांनी उक्कड पिंपरी येथील शिवारात जाऊन दि. २१ जानेवारी गुरूवार रोजी मध्यरात्री  २:३० वा. ल छापा मारला  असता १७ इसम जागीच मिळून आले. त्यांच्या ताब्यातील पत्र्याच्या शेडची व परिसराची पंचा समक्ष  झडती घेतली असता  पत्र्याचे शेडमध्ये पांढऱ्या १६ पोत्यामध्ये ३२८ किलो चंदनाच्या झाडाच्या खोडा मधून काढलेला चंदनाचा गाभा ज्याची किमत ७ लाख ८७ हजार रुपये आहे त्यासह ४ मोटर सायकली, एक मोबाईल, चंदन तोडण्यासाठी व तासण्यासाठी लागणारे कुदळ, कुऱ्हाड, किकरे, वाकस हे साहित्य असा एकूण ९ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या गुन्ह्यात १७ आरोपी ताब्यात घेतले. तसेच त्यातील आणखी ३ आरोपी फरार असून झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चकलांबा पोलीस ठाण्यात २१ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार शफी इनामदार, पोलीस हेडकोन्स्टबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक राजू वंजारे, महादेव सातपुते, संजय टूले यांनी केली.
close