अहमदनगर (प्रतिनिधी) :- निष्पाप गरीब नाथपंथी डवरी गोसावी ( भटक्या व विमुक्त जाती जमाती) समाजातील महिला मोहिनी नितीन जाधव वय वर्ष 30 यांची निर्घुणपणे साखरी शहरातील भाजपचा नगराध्यक्ष अग्रवाल व त्याच्या 30 ते 40 भाजपच्या कार्यकर्त्यांनी व गुंडांनी निर्घुणपणे हत्या केली. मिळालेल्या माहितीप्रमाणे मोहिनी ताई बचावासाठी मोठ्या-मोठयाने आरडा ओरडा करत होती. परंतु या नराधमाने या महिलेचे पाय खेचून फरफटत भर चौकात दगडाने ठेचून लाथाबुक्क्यांनी मारून जागीच ठार मारले.
हा केवढा मोठा अन्याय भटक्या-विमुक्तांच्या समाजावर चालला आहे. खरंच आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत का ? हे खरंतर गंभीर स्वरूपाचा प्रश्न समोर उभा राहिला आहे. या पुर्वी धुळे जिल्हा राईनपाड्य मध्ये निष्पाप पाच तरुणांना आशा जातीवादातून आपले प्राण गमवावे लागले होते. त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे .अत्यंत संतापजनक ही घटना आहे खरंच आपण काळजाच्या ठिकऱ्या उडवणाऱ खैरलांजी हत्याकांड,सोनई येथील मानवी मनाला हादरून सोडणार मेहतर समाजाच्या तीन तरुणाचं कांड ,जामखेड नितीन आगे हत्याकांड , राईनपाडा हत्याकांड अशी कित्येक कांड सांगता येतील या घटना मध्ये गंभीरतेने लक्ष घातलेले नाही म्हणूनच परत परत या आशा प्रकारची या घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहे.
जर आशा प्रकारे आपल्या बहुजन समाजातील निष्पाप बांधवांचा आणि महिलांचा दगडाने ठेचून जीवे ठार मारले जात असेल तर असा नराधमानं वरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा ॲड.योगेश गुंजाळ जिल्हाध्यक्ष भारतीय टायगर फोर्स अहमदनगर जाहीर निषेध केला आहे.

