महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची घेतली औपचारिक भेट..!
बाप्पूसाहेब बोराटे यांच्याअभिष्टचिंतन पर विशेष लेख
इंदापूर प्रतिनिधी:(दिनांक ३० जानेवारी २०२२)बापूसाहेब बोराटे यांचा जन्म ३० जानेवारी १९९१ साली शेटफळ हवेली या लहानश्या खेड्यामध्ये झाला बापूसाहेब यांच्या वडिलांचे नाव बाळासाहेब नारायण बोराटे व त मातोश्री रंजना बाळासाहेब बोराटे घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती, त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ हवेली या ठिकाणी झाले तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली या ठिकाणी पुढील शिक्षण श्री शिवाजी विद्यालय बावडा या ठिकाणी झाले.
माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना शैक्षणिक क्षेत्रात ऐवजी क्रीडाक्षेत्र त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी तेव्हापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली होती, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना खूप जिवाभावाचे मित्र त्याच बरोबर खूप राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभला त्यामध्ये प्रामुख्याने सध्याचे तंटामुक्त समिती शेटफळ हवेली चे विद्यमान अध्यक्ष संजय (मामा) शिंदे यांचा नामोल्लेख करावा लागेल, संजय हे एक असे व्यक्तिमत्व आहे की सर्वसमावेशक सर्वच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व आहे त्यामुळे बापूसाहेब हे पहिल्यापासूनच संजय शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे संजय शिंदे यांनी बापूसाहेबांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
तसे बघितले तर शेटफळ हवेली गावांमध्ये बोराटे आणावाचे एकच घर आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बापूसाहेबांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत करत राजकीय क्षेत्रामध्ये पण संजय शिंदे यांच्या रूपाने पाऊल टाकले ग्रामपंचायत शेटफळ हवेली ची २०१४ झाली पंचवार्षिक निवडणूक लागली होती. यावेळी शेटफळ हवेली गावचे माजी सरपंच शंकर बापू शिंदे व संजय शिंदे यांनी बापूसाहेब बोराटे यांच्या मातोश्री रंजना बाळासाहेब बोराटे यांना उमेदवारी देण्याची घोषित केले परंतु परिस्थिती अशी होती की बापूसाहेब बोराटे वेगळ्या वार्डमध्ये राहत होते आणि त्यांना उमेदवारी ही दुसऱ्या वार्ड मध्ये देण्यात आली तरी बापूसाहेब बोराटे यांचे सामाजिक कार्य आणि शंकर बापू शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्या कार्यावरती लोकांनी विश्वास ठेवून बापूसाहेब बोराटे यांच्या मातोश्रींना खूप मतांनी निवडून दिले.
तेव्हापासूनच बापूसाहेब बोराटे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये खूप अग्रेसर राहत होते या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांना खूप परिस्थितींना सामोरे जावे लागले.
संजय मामा शिंदे यांनी बापूसाहेबांना आपला भाऊ मानला आहे .
बापूसाहेबांची घौडदौड यावर न थांबता पुढेही त्यांना इंदापूर तालुका युवक काँग्रेसमध्ये इंदापूर तालुक्याचे विद्यमान काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय स्वप्नील सावंत यांनी तालुका सरचिटणीस या पदावर त्यांची निवड केली व शेटफळ हवेली सारख्या गावालाही तालुका पातळीवर काम करण्याची संधी दिली याचे संपूर्ण श्रेय बाप्पू साहेबांचे राजकीय मार्गदर्शक संजय मामा शिंदे यांना जाते.
राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बापूसाहेबांनी कधीही सामाजिक क्षेत्राकडे दुर्लक्ष केलएक नाही या त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुढे माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दत्ता भाऊ माळी यांनी इंदापूर तालुका माळी सेवा संघाची अध्यक्षपदाची जबाबदारी बापू साहेबांकडे दिली. तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना बापूसाहेबांनी तालुक्यांमध्ये तर संघटन वाढवलेच त्याच बरोबर संपूर्ण राज्यांमध्येही संघटन वाढविण्यामध्ये खूप मोलाचे सहकार्य केले म्हणून त्यांना दत्ता भाऊ माळी व माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पद देऊन त्यांचा सन्मान केला एवढी मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली, त्यांनी आजपर्यंत माळी सेवा संघामध्ये खूप खूप मोठे प्रमाणात संघटन वाढवले आहे, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या समाजालाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप काही केले आहे.
बापूसाहेब बोराटे यांच्या माध्यमातून सध्या अतिशय हुशार आणि सर्वांना सामावून घेणारा एक मनमिळावू आणि हुशार नेतृत्व असलेला सामान्यातील असामान्य युवा शिलेदार महाराष्ट्रात आपला ठसा उमटवत असल्याचे दिसत आहे त्यांच्या आज अभिष्टचिंतन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा.

