औरंगाबाद । प्रतिनिधी:- मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने काही निवडक एकनिष्ठ सदैव समाज कार्य करणाऱ्या पदाधिकार्यांना संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार प्रदेश कमिटीच्या वतीने भागवत डोंगरे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी तर मराठवाडा अध्यक्ष पदी रमेश सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.
याआधी भागवत डोंगरे यांनी मराठवाडा अध्यक्ष पदी चांगले उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्या मुळे त्यांना पक्षाने बढती म्हणून प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे.तसेच रमेश सुर्यवंशी यांनी सुध्दा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी चांगले उत्कृष्ट कामगिरी पार पाडली असल्यामुळे त्यांना सुध्दा पक्षाने एक मोठी जबाबदारी दिलीआहे.
आता औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. वरील निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

