वसंतदादा मल्टिस्टेट अल्पावधीतच नावारूपास - व्हा.चेअरमन,राजेश धमेजानी
शिर्डी । एक्सप्रेस लाईव्ह:-
शिर्डी :- वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या वतीने आज 26 जानेवारी रोजी शिर्डी येथील मुख्य कार्यालयात "वसंतदादा सहकार दिवस" साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अंतर्गत लेखा परीक्षक मा.अरुण बेंद्रे यांनी कोरोना लढ्यानंतर प्रामाणिक काम करणाऱ्या संस्थांना खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ असून संकटात संस्थेने लढवय्या भूमिका ठेवावी व आपल्या सभासदांना सक्षम सेवा द्यावी, असे प्रतिपादन केले.
आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शिर्डी येथील वसंतदादा सभागृहात संस्थेने मोजक्या सभासद संचालक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. सर्वप्रथम दुपारी 12 वाजता संस्थेचे चेअरमन मा.मुकुंद सिनगर, व्हा. चेअरमन मा. राजेश धमेजानी, संचालक मा.बाजीराव शेवाळे आणि संचालक मा.दीपक धट यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी परीक्षक मा.अरुण बेंद्रे यांच्याकडून शाखा अंतर्गत कामकाजाबाबत शिर्डी शाखेचे व्यवस्थापक श्री.श्याम सापिके, कोपरगाव शाखेच्या व्यवस्थापिका सौ.अनुराधा रणदिवे, अकोले शाखेचे व्यवस्थापक श्री.संदीप चौधरी यांच्यासह सर्व कर्मचारी यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर दुपारी 3 वाजता महिलांचा "हळदी कुंकू" कार्यक्रम घेण्यात आला. स्वयंस्फूर्तीने संस्थेच्या संचालिका मा.सारिका मुकुंद सिनगर व संचालिका मा.वनिता अनुप गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत संस्थेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कोरोना पार्श्वभूमीवर नववर्ष व संक्रांतिनिमित्त मोठे कार्यक्रम घेता आले नाही म्हणून संस्थेत कुठल्याही अतिरिक्त खर्चाची नोंद न करता मा.संचालक मंडळाच्या वतीने मोजक्या महिला सभासदांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही वातावरणात भेटवस्तू देत कोरोनाचे सर्व नियम पाळत कार्यक्रमाचे आयोजन केल्याने संस्थेने सहकारात नवीन आदर्श ठेवला आहे. यानंतर शेवटी मा.संचालक मंडळाची खेळीमेळीत सभा संपन्न होऊन सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी स्थानिक संचालक मा.मिनिनाथ शिंदे, मा.सुधाकर वादे, मा.भीमा संवत्सरकर, मा.अतुल लोहाटे, मा.भागवत चोळके, मा.दत्तात्रय सुखदेव सिनगर, मा.संतोष मूळम, मा.रविंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सरव्यवस्थापक श्री.गणेश वाळुंज यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी कर्ज विभागप्रमुख श्री.अनिल कापसे यांनी आभार मानले.

