शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १२ डिसेंबर २०२२
कांदा पिकाची लागवड विक्रमाकडे ; १ लाख ४२ हजार हेक्टरवर लागवड..!!
अहमदनगर : कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांदा पिकाला यंदा शेतकऱ्यांनी पहिली पसंती दिल्याचे दिसत आहे.
आतापर्यंतचा १ लाख १० हजारांची लागवडीचा टप्पा यंदा मोडित काढत शेतकऱ्यांनी चालू हंगामात १ लाख ४२ हजार हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केलेली आहे. येत्या आठ दिवसांत कांदा लागवडीचे क्षेत्र हे दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यातील कांदा पिकाच्या लागवडीचा विक्रम ठरणार आहे.
कांदा पिकाची लागवड विक्रमाकडे!
सततचा पाऊस, खराब हवामान असतांना देखील शेतकरी मोठी जोखीम घेवून कांदा पिकाची लागवड करतांना दिसत आहेत. यंदा परतीचा पाऊस लांबल्याने ज्वारी पिकाच्या पेरणीची अडचण झाली. जवळपास ज्वारी पिकाचे क्षेत्र अन्य पिकांकडे वळाले.
याच सोबत यंदा आश्चर्यकारक म्हणजे हरभरा पिकाची पेरणी देखील जवळपास ५० टक्क्यांनी घटली आहे. या दोन्ही पिकांच्या ऐवजी शेतकऱ्यांनी कांदा पिकाला पसंती दिल्याचे कांदा पिकाच्या लागवडीच्या आकडेवारीवरून दिसत आहे.
दुसरीकडे कांदा पिकाला चांगला भाव मिळत असल्याने एकरी लागवडीसाठी हजारो रुपयांचा खर्च सोसून शेतकरी कांदा लागवड करत आहेत. जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी असणारा एकरी ७ ते ८ हजारांचा भाव आता १० हजारांपर्यंत वधारला आहे. एवढी रक्कम मोजून देखील शेतकऱ्यांना कांदा लागवड करणाऱ्या अनुभवी महिल्यांच्या टोळ्या मिळत नसल्याचे चित्र आहे. तरीही जिल्ह्यात दर आठवड्याला कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र हे वाढतांना दिसत आहे.
शनिवारी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकनंबर कांद्याला २ हजार ५०० ते ३ हजार २००, दोन नंबर कांद्याला १ हजार ५०० ते २ हजार ५०० आणि तीन नंबर प्रतीच्या कांद्याला ७०० ते १ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळालेला आहे. खराब हवामानामुळे कांदा पिकाचे उत्पादन देखील घटलेले असून यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची अडचण होत असून किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे २५ ते ३० रुपये प्रती किलो असल्याचे दिसत आहे.
कांदा पिकाची लागवड विक्रमाकडे!
बॉलिवूड सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात!
दरम्यान जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पेरण्यांची टक्केवारी ५८ टक्क्यांवर पोहचली असून आता ऊस, कांदा, चारा पिके वगळता ३ लाख ६२ हजार रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी पूर्ण झालेल्या आहेत. तर सर्व पेरण्याची टक्केवारी ही ८८ टक्क्यांवर पोहचली असून पेरणी झालेल्या क्षेत्राची आकडेवारी ही ६ लाख ४२ हजार २८७ हेक्टर झालेली आहे.
पीकनिहाय झालेली पेरणी कंसात टक्केवारी....
ज्वारी १ लाख ८५ हजार ४०० (३९ टक्के), गहू ७७ हजार ११९ (१३६ टक्के), मका ११ हजार ९१४ (५५ टक्के), हरभरा ८० हजार ५४ (५२ टक्के), करडई ६२ (१० टक्के), जवस २६ (१७ टक्के), ऊस लागवड ५९ हजार ४४६ (५८ टक्के), चारा पिके ६० हजार ३५१, कांदा १ लाख ४२ हजार २१९, बटाटा २८४, टोमॅटो ७४३, भाजीपाला पिके ११ हजार ८४३, मसाला पिके १९४, सुगंधी औषधी वनस्पती पिके २३, फुलपिके ७३१ आणि फळपिके ३ हजार ७०७ हेक्टर आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

