shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री. बुवाजी बाबा ,शिवभक्त भगत बाबांच्या चांदीच्या मुकुटांची इंदापूरच्या श्री.बाबीर बाबांची हृदयस्पर्शी भेट झाली.महंत दत्तू बाबा कुऱ्हे यांची माहिती.

श्री. बुवाजी बाबा ,शिवभक्त भगत बाबांच्या चांदीच्या मुकुटांची इंदापूरच्या श्री.बाबीर बाबांची हृदयस्पर्शी भेट झाली.
महंत दत्तू बाबा कुऱ्हे यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी :( दि.३) सिन्नर तालुक्यातील श्री.क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान (कुऱ्हे वस्ती) मऱ्हळ बुद्रुकचे महंत श्री.दत्तू बाबा कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ३  दिवसीय श्री बुवाजी बाबा, शिवभक्त भगत बाबांच्या चांदीच्या मुकुटांची पालखीसह श्री. क्षेत्र बाबीर देव रुई (इंदापूर) यांच्या भेटीचा सोहळा मोठ्या भक्तीभावाने हलगीच्या गजरात, अश्व नृत्य, गज ढोलाच्या निनादात ,संगीत, भजन, नाचत, गुलालाची उधळण करत भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने,उपस्थितीत भक्तिमय,आनंदी वातावरणात दि. ३१/१२/२०२१ ते दि.२/१/२०२२ दरम्यान मोठ्या उत्साहात हा दैदिप्यमान सोहळा संपन्न झाला.
महंत कुऱ्हे म्हणाले की, महाराष्ट्राच्या तमाम भाविकांचे दैवत असलेल्या इंदापूर तालुक्यातील रुई गावच्या श्री. बाबीर देवाची महती सर्वदूर आहे. श्री बाबीरच्या मंदिराला अनेक वर्षांचा इतिहास असून त्याचा मोठा महिमा आहे.नाशिक,नगर, जळगाव, पश्चिम महाराष्ट्रासह देशभर विखुरलेले श्री. बाबीर बाबाचे मोठ्या संख्येने भाविक, भक्तगण असून दर वर्षी दर्शनाला भक्तीभावाने येत असतात. याचं श्री. बाबीर देवाच्या भेटीला आमच्या मऱ्हळ बु!!( सिन्नर) येथून खासगी वाहनांच्या ताफ्यातून स्वयंस्फूर्तीने शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दि.३१ डिसें.२१ रोजी मार्गस्थ झालेला श्री.बुवाजी बाबा, शिवभक्त भगत बाबांच्या चांदीच्या मुकुटांच्या पालखीचा सोहळा मजल दर मजल करत विसावा घेत,मुक्काम करत आरती, संगीत,भजन,महाप्रसादाचा आस्वाद घेत हा भव्य दिव्य दिमाखदार सोहळा नवीन वर्षात दि.२ जाने.२०२२ रोजी इंदापूर तालुक्यातील रुई मुक्कामी श्री.क्षेत्र बाबीर देवाच्या भेटीला दाखल झाला.
 पालखी सोहळ्याचे स्वागत गावातील नागरिकांनी मोठ्या भक्तीभावाने केले. श्री.बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा.अजितसिंह पाटील व इंदापूरचे श्री.नानासाहेब सानप सर यांनी मुकुट पालखी सोहळ्याचे दर्शन घेत पालखीतील श्री. बुवाजी बाबा, शिवभक्त भगत बाबांच्या मुकुटांवर पुष्पवृष्टी करत पुष्पहार अर्पण केला.तदनंतर  महंत श्री.दत्तू बाबा कुऱ्हे यांचाही यथोचित सत्कार केला. यावेळी मा. अजितसिंह पाटील यांचा सत्कार महंतांनी केला.
दि.२ जाने.२०२२ रोजी सकाळी श्री. बाबीर देव मंदिर परिसरात श्री. बुवाजी बाबा, शिवभक्त भगत बाबांच्या 
 चांदीच्या मुकुटांची मिरवणूक पालखीत निघाली, तिही भाविकांच्या  उस्फुर्त उपस्थितीत हलगी आवाजात, गज ढोलच्या निनादात, नाचत, गुलालाची उधळण करत. 
...अखेर भाविकांची त्या हृदयस्पर्शी ऐतिहासिक भेटीची उत्कंठा शिगेला पोहोचली शेकडो भक्तांच्या उपस्थितीत श्री. बुवाजी बाबा, शिवभक्त भगत बाबांच्या चांदीच्या मुकुटांची व श्री बाबीर देवाची हृदयस्पर्शी भेट झाली.
तो सुवर्ण क्षण हा नेत्रदीपक आणि  दैदिप्यमान होता. शेकडो भाविक, भक्तगण या हृदयस्पर्शी भेटीचे साक्षीदार ठरले.
अशी माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि श्री.बुवाजी बाबा देवस्थान (कुऱ्हे वस्ती) मऱ्हळ बु !! चे महंत श्री. दत्तू बाबा कुऱ्हे यांनी पत्रकारांना दिली.
close