shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापूरी येथे प्राथमिक शाळा मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.रोटरी क्लब ऑफ वरकुटे यांच्या तर्फे शाळेत १५० मुला-मुलींना सॉक्सचे वाटप

वडापूरी येथे प्राथमिक शाळा मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

रोटरी क्लब ऑफ वरकुटे यांच्या तर्फे शाळेत १५० मुला-मुलींना सॉक्सचे वाटप
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक 3 जानेवारी २०२२ सोमवार. रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई  फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम बावडा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा गार्डे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गार्डे मॅडम यांनी मुलींना सावित्रीबाई यांच्या कार्याचा परिचय करून दिला‌. 
 सावित्रीबाई यांच्या वेशात आलेल्या मुलींनी सावित्रीबाई विषयी माहिती सांगितली. तसेच शिक्षिका मनिषा मोरे मॅडम यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
  या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वरकुटे यांच्या तर्फे शाळेत १५० मुला-मुलींना सॉक्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका रजिया शेख, शिक्षिका मनिषा मोरे, प्रतिभा गर्कळ, शामसुंदर माने तसेच अंगणवाडी सेविका माधुरी कदम,कोमल चंदनशिवे, त्याचप्रमाणेअनेक महिला पालक यांची उत्साहवर्धक उपस्थिती होती.
close